नगर: गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हाती लागला नाही. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ८ लाख ३१ हजार शेतकर्यांना शासना. यंदा पावसानेच पाठ फिरवल्याने ९ लाख ६२ हजार ११७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. त्यामुळे जवळपास १२ लाख १५ हजार ६६९ बाधित शेतकर्यांना १३६५ कोटी १४ लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाला करावी लागणार आहे.