नवी मुंबई : राजेंद्र पाटील दिवाळीच्या तोंडावर मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड आणि किसमिसच्या दरांनी मोठी उसळी घेतली असून सर्वच प्र. दरवाढीचे हे प्रमाण ३५ ते ४० टक्के आहे. असे असले तरी यंदाच्या दिवाळीत एपीएमसीमध्ये दहा ते अकरा हजार टन सुकामेवा विक्री होईल आणि उलाढाल ६०० ते ६५० कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज मुंबई एपीएमसीतील घाऊक सुकामेवा व्यापारी मनीभाई वाग्ड यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केला..