नगर: शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीमधील संभाव्य अनियमितता शोधण्यासाठी राज्यस्तरावर तपासणी सुरू असताना, आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षण विभागान. सन २०१२ ते २०१६ या कालावधीत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या वैयक्तिक मान्यतांचे प्रस्ताव शिक्षण संचालक कार्यालयाने मागविले आहेत. प्राथमिकचे सुमारे २००, तर माध्यमिक शिक्षण विभागातील ८०० हून अधिक प्रस्तावांची तपासणी होणार आहे. .राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ प्रणालीतील नोंदींच्या अनुषंगाने पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे.