Viral Newsकानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अजब प्रकरण समोर आले आहे. एकाच पतीवरून तीन पत्नींमध्ये करवा चौथची पूजा आधी कोणी करायची, यावरून मोठा वाद झाला. ति. तिन्ही महिला पोलीस ठाण्यात पोहोचल्या आणि प्रत्येकीने त्या पतीवर आपला हक्क सांगितला. बराच वेळ त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर या वादावर तोडगा निघाला..मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या बिठूर परिसरातील एका गावात राहणाऱ्या व्यक्तीला पहिल्या लग्नानंतर अनेक वर्षे अपत्य नव्हते.