पुणे : आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असतानाच बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची श. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची स्थिती आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होणार का? याकडे हवामान अभ्यासकांचे लक्ष लागले आहे..दक्षिण अंदमान समुद्रात नवीन प्रणालीअंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे.