पुणे: पाणीवाटपात कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, यासाठी संबंधित अधिकार्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पाणी वितरणाचे योग्य नियोजन करून शेवटच्या घटकापर. पाणी वितरणाचे योग्य नियोजन करून शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या..बंधार्यांच्या दुरुस्तीची कामे, पाण्याचा पुनर्वापर, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि सर्व लाभधारकांना समान संधीने पाणी उपलब्ध करून देणे, या बाबींना प्राधान्य देऊन संबंधित विभागाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले..