पुणे: डीएसके समूहाच्या जप्त मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत मिळविण्याच्या प्रक्रियेला आणखी एक कायदेशीर अडथळा निर्माण झाला आहे. समूहाच्या १९५ मालमत्त. समूहाच्या १९५ मालमत्तांच्या लिलावासाठी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी आणि विशेष सरकारी वकिलांनी केलेला अर्ज मुंबईतील विशेष पीएमएलए व एमपीआयडी न्यायालयाने फेटाळला. एमपीआयडी कायद्यानुसार लिलावासाठी अर्ज करण्याचा अधिकार केवळ शासननियुक्त सक्षम प्राधिकरणालाच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले..