नगर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपताच, दिवाळीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे फटाके फुटण्याची शक्यता आहे. मुदत संपलेल्या स्थानिक स्वर. मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने नगरमध्येही झेडपी, पंचायत समितीच्या इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे..अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत २१ मार्च २०२२ रोजी संपली.