Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियमवरील ड्रोन शोदरम्यान दोन ड्रोन चर्चगेट रेल्वे स्टेशनवर कोसळले; प्रवासी जखमी, नक्की काय घडलं? Mumbai Drone Accident Churchgate station: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी रात्री टेलिकॉम कंपनीच्या ड्रोन शोदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वेस्थानकावर (Churchgate Railway station) उभा असणारा एक प्रवासी जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेने चर्चगेट रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाली होती.