शांततेचा नोबेल पुरस्कार ट्रम्प यांनाच मिळेल, असे त्यांना स्वतःला वाटत होते; पण नाही. पुरस्कार मिळाला नाही. ट्रम्प यांचे स्वप्न विरले. मग, त्यांचे आकांडतांडव सुर. हा पुरस्कार कसा अयोग्य आहेपासून ते हा पुरस्कार देणारा नॉर्वे कसा अयोग्य आहे, हे सांगायला ट्रम्पनी सुरवात केली. असे केल्यानेही हा पुरस्कार काही त्यांना मिळणार नव्हताच. म्हणतात ना, 'बूँद से गयी वो हौद से नहीं आती...' पण, एवढ्यावर थांबतील तर ते ट्रम्प कसले...