मुंबई : मराठी रंगभूमीवर तुफान गाजणाऱ्या ‘आमने-सामने’ या नाटकातील कलाकारांमधील अंतर्गत वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. मानधनवाढीच्या मुद्द्यावरून अभिनेता रोहन गुज. मानधनवाढीच्या मुद्द्यावरून अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांना अचानक नाटकातून डच्चू देण्यात आल्याने दोन्ही बाजूंनी सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. या प्रकरणावर नाट्यसृष्टीत दोन तट पडले असतानाच, आता ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी अत्यंत थेट शब्दांत भूमिका मांडत निर्माते आणि तरुण कलाकार या दोघांनाही खडे बोल सुनावले आहेत..