राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना मिश्किल टोला देखील लावल्याचं पहायला मिळालं. दरम्यान कार्यक्रमापूर्वी फडणवीस आणि दोन्ही ठाकरे बंधू य़ांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली. ही चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.