बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेची ताकद किती अफाट होती, याचा एक खास किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगितला. यावेळी त्यांनी व्यासपीठावर उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाज देत हा किस्सा सांगितला. राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना अनेकदा रंगतो. दोन्ही बाजूंनी नेते एकमेकांवर टीका करतात. पण आज वेगळं चित्र पहायला मिळालं.