Ramayana : रणबीर कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ' रामायण ' हा जगभरात रिलीज करण्याची तयारी सुरू आहे. पण पाकिस्तानमध्येही हा पिक्चर रिलीज होणार का. Ramayana : अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या ' रामायण ' चित्रपटाबद्दल चाहते अतिशय उत्सुक आहेत. येत्या 5 नोव्हेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, ज्याची चाहते अत्यंत आतुरतेने वाट पहात आहेत. या चित्रपटाबद्दल रोज नव-नवे अपडेट्स समोर येत असतात, तसेच अनेक चर्चाही होत असतात.