Signs of Vastu Dosh: घरात वास्तुदोष असल्यास त्याचा परिणाम घरातील सुख-शांती, आर्थिक स्थिती आणि कुटुंबातील नात्यांवर होऊ शकतो, असं मानलं जातं. घरात वास्तु दोष आहे की नाही, हे काही संकेतांवरून ओळखता येतं. जाणून घ्या वास्तुदोषाची लक्षणं आणि ते दूर करण्यासाठी काही सोपे उपाय. घरात सुख-शांती आणि सकारात्मक वातावरण असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, काही घरांमध्ये सतत वादविवाद होतात, आर्थिक अडचणी निर्माण होतात किंवा महत्त्वाची कामं वारंवार रखडतात.