विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजप आणि शिवसेनेतील मतभेद चर्चेत आले आहेत. नागपूर आणि पुण्यातील निकालांनी शिंदेंच्या राजकीय ताकदीचा नवा संदेश दिला का? त्यातच फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विधान परिषदेतल्या पराभवानंतर भाजप शिवसेनेत घमासान सुरु आहे. फडणवीस गडकरी आरएसएसच्या अंगणात कॉग्रेसनं भाजपच्या नाकाखालून नागपूर पदविधरमध्ये विजय खेचून तर पुणे माझं दुसरं घर म्हणणा-या फडणवीसांना तेल लावलेल्या पैलवानाने पदविधर निवडणूकीत धोबीपछाड दिला.