Healthy Recipe for Kids: बहुतांश मुलांना बिस्कीट, कुकीज खायला आवडतात. पण जर तुम्हाला त्यांना मैदा आणि साखरेपासून बनवलेल्या कुकीज खायला द्यायच्या नसतील तर तुम्ही बेसन आणि ओट्सपासून टेस्टी कुकीज बनवू शकता. ही सोपी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. अगदी लहान मुलांना सुद्धा बिस्कीट, कुकीज खायला आवडतात. पण मैदा आणि साखर घालून बनवलेल्या कुकीज बहुतेकदा आरोग्यासाठी हानिकारक असतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ते खाणे टाळावे असे म्हटले जाते.