आता पोलिसांविरोधात मोर्चा - पुरावे असूनही अटक होत नसल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप. २९ : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात अद्याप मुख्य सूत्रधाराला अटक का करण्यात आली नाही, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी उपस्थित केला. या प्रकरणात पोलिसांकडे पुरावे असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी थेट पोलिसांच्या विरोधातच आता मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.