एप्रिल २०२७ पासून सुरू होणाऱ्या मुंबई विमानतळ टर्मिनल १ च्या नूतनीकरणामुळे हवाई वाहतुकीत मोठे बदल. नवी मुंबई विमानतळाचा वापर आणि एअरलाईन्सचे स्थलांतर. विमानतळाचा कायापालट आणि नवे नियोजन Adani Airport Holdings Ltd (AAHL) ने एप्रिल २०२७ पासून मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ चे मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास करण्याचे जाहीर केले आहे. हा प्रकल्प साधारण २ वर्षे चालणार असून, या काळात येथे कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना दोन पर्याय दिले जाणार आहेत.