Pratap Sarnaik on Meenakshi Shinde: प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूने ठाण्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. ठाकरे गट सध्या मिनाक्षी शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाला आज एक महिना पूर्ण होत आहे. 29 सप्टेंबरला रात्री पुर्णेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आजपर्यंत ठाण्यात प्रचंड आंदोलने, मोर्चे आणि विरोध झाले, आज देखील कुटुंबीय रात्री 8 वाजता शांततेत कँडल मार्च काढून प्रदीप पूर्णेकर यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.