Gokul Election: जिल्ह्यातील 5.5 लाख शेतकऱ्यांनी आम्हाला बहुमत दिलं आहे. त्यामुळे कोरमचा मुद्दा उपस्थित न करता महायुतीच्या संचालकांनी सभेसाठी उपस्थित राहावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून पुन्हा एकदा घमासान रंगण्याची चिन्हे आहेत. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालकांच्या उपस्थितीचा कोरम मुद्दा हा महत्त्वपूर्ण ठरला असून यासाठी आता कायदेशीर काथ्याकूट होण्याची चिन्ह आहेत.