शरद पवारांची भेट घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुखांचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी निवडणूक प्रकियेवरून गंभीर आरोप केला आहे. पुणे विभागातील पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवाराला पराभवाला सामोरे जावं लागलं. पुण्यातील दोन्ही मतदारसंघात महायुतीत उमेदवारीवरून हेवेदावे करण्यात आले होते. परंतु शेवटच्या क्षणी भाजपने दोन्ही मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. तर शिंदे गटाने शिक्षक मतदारसंघात उमेदवार दिला. दोनपैकी पदवीधरमध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावं लागले. पदवीधरमध्ये शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख यांनी बाजी मारली.