Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करताना किचन कॅबिनेटवरील तेलकट चिकटपणा आणि हट्टी डाग काढणं अनेकांसाठी कठीण ठरतं. मात्र, घरात उपलब्ध असलेल्या काही साध्या गोष्टींच्या मदतीने हे सहज होऊ शकतं. किचन कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी घरी क्लिनिंग सोल्यूशन कसं तयार करायचं हे जाणून घ्या. दिवाळीचा सण जवळ येताच घराघरांमध्ये साफसफाईची लगबग सुरू होते. घरातील इतर वस्तूंसोबतच किचनची स्वच्छता करणंही महत्त्वाचं असतं. मात्र, किचनमधील कॅबिनेट स्वच्छ करणं अनेकांसाठी डोकेदुखी ठरतं.