विजयानंतर प्रतिक्रिया देताना सरनाईक यांनी शिक्षकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या समस्या विधिमंडळात मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना ११ हजार ४८१ मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांना ६ हजार ९७८ मते मिळाली. निर्धारित मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर किरण सरनाईक यांना अनधिकृतरीत्या विजयी घोषित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.