Gokul President Election : गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सतेज पाटील आणि महायुतीच्या पॅनलमध्ये फक्त एका जागेचं अंतर आहे. सतेज पाटील यांच्या पॅनलकडे 13 तर महायुतीच्या पॅनलचे 12 उमेदवार निवडून आलेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणूक निकालावरुन महायुतीमध्ये आपसात सामना रंगला आहे. भाजप आणि शिवसेनेत परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. हा वाद सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा विषय काढला आहे.