उपसंचालक कार्यालयाकडील मूळ शालार्थ मंजुरी आदेश प्राप्त नसताना कुठलीही पडताळणी न करता ११ शाळांच्या ९५ बनावट शालार्थ प्रणालीतील कार्यालयीन अभिलेखांची पडताळणी न करता वेतन अदा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यभर गाजणाऱ्या बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील अभिलेखांची पडताळणी न करता वेतन अदा केल्याच्या संशयावरून जळगावचे सेवानिवृत्त वेतन अधीक्षक राजमोहन हरिप्रसाद शर्मा यांना नाशिकच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शिताफीने अंबाजोगाई येथून बेड्या ठोकल्या.