Kundmala accident : पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील बेगडेवाडी परिसरात इंद्रायणी नदीपात्रातील कुंडमळा येथे बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) दुपारी ही घटना घडली. स्वप्नील सतीश सोनवणे (वय १५, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.