Pune Crime News - झाडाखाली बसलेल्या एकाने त्यांच्याजवळ येऊन मला भूक लागली आहे, काहीतरी दे.. असे म्हणत खिसे तपासायला सुरुवात केली. . पुणे : मला भूक लागल्याचे म्हणत तरुणाकडे भिक्षेकऱ्याने मागणी केली. त्यानंतर त्यांचा खिसा तपासायला सुरुवात केल्यामुळे तक्रारदाराने विरोध केला. त्याचा राग आल्यामुळे संबंधिताने तरुणावर लोखंडी हत्याराने वार करून गंभीररीत्या जखमी केले आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे.