Dengue outbreak in Pune : लोकमत इम्पॅक्ट 'लोकमत'च्या दणक्यानंतर डास प्रतिबंधात्मक औषध फवारणीला सुरुवात. लोहगाव : पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत 'लोकमत'ने ' डेंग्यूचा उद्रेक; महापालिकेच्या उपाययोजना कागदावरच' या मथळ्यांतर्गत वृत्त प्रकाशित करून महापालिकेच्या आरोग्य विभागाला धारेवर धरले होते. 'लोकमत'च्या या सविस्तर वृत्ताचा इम्पॅक्ट लोहगाव व परिसरात दिसून आला असून, महापालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडवर आली आहे.