विधान परिषद निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीमधील अंतर्गत वाद आता उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. मित्रपक्षाने साथ न दिल्यामुळे महायुतीला मोठा फटका बसल्याचा आरोप भाजपने शिवसेनेवर केला होता. पुण्यात दुसऱ्याला पाठिंबा देणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केल्याचा ठपका ठेवत भाजपने शिवसेनेच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले होते. भाजपच्या या आरोपांना आता शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रत्युत्तर दिले असून, "भाजपने शिवसेनेवर पराभवाचे खापर फोडू नये, समन्वय साधण्यात भाजपच कमी पडली आहे," असा पलटवार त्यांनी.