- सुरक्षेचा प्रश्न गंभीर; कर्मचारी आणि तपासणी यंत्रसामग्रीचीही वानवा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज. मांजरी : सुमारे सव्वा लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या मांजरी बुद्रुकमधील प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी असल्याचे चित्र आहे. अस्वच्छ परिसर, सुरक्षेचा अभाव, बंद अवस्थेतील वीज-पाणी आणि ड्रेनेज सुविधा, अपुरा कर्मचारी वर्ग आणि आवश्यक तपासणी यंत्रसामग्रीची कमतरता यामुळे रुग्णसेवेवर मर्यादा येत आहेत.