मुंबई उच्च न्यायालयाने आयुक्तांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. तर, अवमानासाठी शिक्षा देण्यास नकार देत अवमान याचिका निकाली काढली आणि संबंधित प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही त्यांचे पालन करण्याऐवजी मिरा-भाईंदर पालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याची सूचना केली. सार्वजनिक संस्थांमधील उच्चपदस्थ अधिकारी न्यायालयांच्या स्पष्ट निर्देशांचे पालन करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आभास यातून निर्माण होतो, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने आयुक्तांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.