राम मंदिर पूर्वेकडील रेल्वे हद्दीतल्या परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाचे ४३ कर्मचारी, शहर पोलिसांचे पाच कर्मचारी, रेल्वेच्या संबंधित विभागांचे कर्मचारी आणि कंत्राटदाराचे २२ कामगार उपस्थित होते. लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोरीवली-विरारदरम्यान उभारण्यात येणाऱ्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांच्या विस्तारासाठी अडथळा ठरणारी राम मंदिर स्थानकाच्या पूर्वेकडील २८ अतिक्रमणे पश्चिम रेल्वेने मंगळवारी हटवली. रेल्वे सुरक्षा दल, शहर पोलिस आणि संबंधित विभागांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.