रेल्वे स्थानकांवर दररोज अंदाजे २० ते ३० टन कचरा निर्माण होतो. सध्या हा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकांच्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. मात्र, आता कचरा गोळा करणे, ओला-सुका वर्गीकरण करून प्रक्रिया करणे आणि पुनर्वापरासाठी पाठवणे, अशी व्यवस्था रेल्वे स्वतः विकसित करणार आहे. . लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबईतील स्थानकांवर दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मध्य रेल्वे पाच ठिकाणी कचरा वर्गीकरण आणि पुनर्प्रक्रिया केंद्रे उभारणार आहे.