राजेंद्र जोशीकोल्हापूर : केंद्र शासनाने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी हायब्रीड व मालदांडी ज्वारीसाठी प्रतिक्विंटल अनुक्रमे ४ हजार २३ रुपये आणि ४ हजार ७३ रुपये इतक. परंतु, भाव पाडल्यामुळे बाजार समित्यांमध्ये ज्वारी उत्पादक शेतकर्यांना प्रतिक्विंटल ३ हजार ७०० रुपये दराने ज्वारी विकावी लागली. प्रत्यक्षात देशांतर्गत किरकोळ बाजारात या ज्वारीने प्रतिक्विंटल सरासरी १० हजार रुपयांचा दर गाठला आहे. याचा अर्थ ज्वारीच्या प्रतिक्विंटलमागे बाजारात ७ हजार रुपयांची नफेखोरी सुरू आहे.