सातारा : सातारा जिल्ह्यात ५३ गावे २८९ वाड्या-वस्त्यांवर ४४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस कडक ऊन पडत असल्याने दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. त्या. त्यामुळे गावोगावी आणखी पाण्याचे टँकर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे..पावसाने हुलकावणी दिली असल्याने जिल्ह्यातील ग्रामीणसह शहरी भागात पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाढत्या उन्हामुळे विहिरी, नदी, नाले व बंधारे, तलावामधील पाणी पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना गावोगावी धावपळ करावी लागत आहे.