खानापूर : हलशी-मेरडा-नागरगाळी रस्त्याची दूरवस्था, खड्डे आणि धुळीमुळे प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थ हैराण झाले होते. अपघातांचा धोका वाढल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी. अपघातांचा धोका वाढल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी जणू मृत्यूचा सापळाच बनला होता. या गंभीर समस्येवर दैनिक ‘पुढारी’ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करुन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. अखेर या वृत्ताची दखल घेत रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून रस्त्याचे काम मार्गी लागले आहे..