मिरज : मिरजेच्या ऐतिहासिक गणेश तलावात बुधवारी सुमारे दीड टन मासे मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याने परिसरात खळबळ उ. नागरिकांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला याबाबत बुधवारी माहिती दिली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व मासे बाहेर काढले. माशांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पाण्याची तपासणी आणि संबंधित यंत्रणांचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे..गणेश तलावाला मिरजेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे.