आष्टा : आष्टा-मर्दवाडी रस्त्यावरील कुंबळे मळा आणि थोटे मळा परिसरात विजेच्या तारांमधील शॉर्टसर्किटमुळे सुमारे ४० एकर आडसाली ऊस आगीत जळून खाक झाला. ही भीषण घटना स. २७ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली. उसाच्या फडाला अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले..भरदुपारी लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. उसाच्या फडांमधून आगीच्या उंच ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट उठू लागले.