सांगली : महापालिका क्षेत्रातील पाणीपट्टीची थकबाकी आणि चालू मागणी मिळून एकूण ७९ कोटी ५६ लाख रुपयांची येणेबाकी आहे. मात्र, १ एप्रिल ते २७ ऑक्टोबर २०२६ या सात महिन. मात्र, १ एप्रिल ते २७ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत अवघे ५ कोटी ५ लाख रुपये जमा झाले आहेत. एकूण मागणीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याने महापालिकेसमोर वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.