सोलापूर : विवाहासाठी इच्छुक व्यक्तींना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा विजापूर नाका पोलिसांनी पर्दाफाश केला. सोलापुरातील एका तरुणाचे लग्न लावून त्याच्या घरातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. याचा तपास करुन पोलिसांनी पुणे, जालना आणि सोलापूर जिल्ह्यातून सहा जणांना अटक केली..विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, १८ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संबंधित व्यक्तींनी संगनमत करून फिर्यादीची फसवणूक केल्याचा आरोप आहे.