सोलापूर : लोकशाही आणि मतदानाचा अधिकार वाचविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी (दि.१) दिल्लीत देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. व्होट बचाव. व्होट बचाव, देश बचाव या अभियानांतर्गत होणाऱ्या या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ५०० कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक दिनेश कोडानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली..केंद्रातील भाजप सरकारकडून लोकशाही संपविण्याचे प्रयत्न सुरू आहे. मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप कोडनिया यांनी केला.