बार्शी : मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदेश कृष्णदेव पवार याला लाचलुचपत प्रतिब. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी, शेतकरी असलेल्या तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करतो असे सांगून पोलीस हवालदार संदेश पवार याने एक लाखांची मागणी केली होती. तक्रारदाराने रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर २० हजार रुपये मागितले, तडजोडीअंती १० हजारांवर मागणी केली..