मोडनिंब : जाधववाडी व बैरागवाडी (ता. माढा) या गावांना सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे, यासाठी काही दिवसांपूर्वी सोलापूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंद. त्यावेळी प्रशासनाने पिण्यासाठी पाणी सोडतो, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात ८ नंबर फाट्याने पाणी सोडूनही जाधववाडी व बैरागवाडीला थेंबभरही पाणी मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे..जाधववाडी व बैरागवाडी येथील संतप्त शेतकऱ्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून लक्षवेधी आंदोलन केले.