सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली आहे. अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि.२८) माजी आ. दिलीप माने, जयवंतराव जगताप, जिल्हा. दिलीप माने, जयवंतराव जगताप, जिल्हा परिषदेचे सदस्य पृथ्वीराज माने, शंभूराजे जगताप यांच्यासह नऊ जणांनी अर्ज दाखल केले..जिल्हा बँकेसाठी सोमवारी (दि.२६) पासून अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या तीन दिवसात चारशेपेक्षा जास्त जणांनी अर्ज खरेदी केले आहे.