सोलापूर : सोलापूर-हैदराबाद बाह्यवळण रस्त्यावर डी मार्टसमोर बुधवारी (दि. २८) दुपारी कंटेनर आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभ. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..या दुर्घटनेमुळे बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी डी मार्टसमोरील बाह्यवळण रस्त्यावर कंटेनर आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली.