Laxmi Pujan 2026: यंदा कार्तिक अमावस्या दोन दिवस असल्याने लक्ष्मीपूजन नेमके कोणत्या दिवशी करावे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे दिवाळी 8 नोव्हेंबरला की 9 नोव्हेंबरला साजरी करायची, याबाबत मनात संभ्रम आहे. जाणून घ्या दिवाळीची योग्य तारीख, अमावस्येची तिथी आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.