Maharashtra MLC Election Results 2026: राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीमध्ये पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूरच्या पदवीधर मतदारसंघात राज्यातील सत्ताधारी महायुतीला पदवीधर मतदारांनी जबर दणका दिला आहे. तर पुणे आणि अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारासंघात महायुतीचा विजय झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणूक झालेल्या एकूण पाच मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी महाविकास आघाडीची सरशी झाली आहे.