Praful Patel NCP : विधान परिषद निवडणुकीवेळी पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा न करता निर्णय केल्याने आणि पुणे पदवीधरची जागा हक्कांची असून देखील सोडल्याने यापूर्वीच प्रफुल पटेल यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. आजचा विधान परिषद निवडणुकीच्या निकालातून त्यांनी पक्षाला एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा दिल्याच समोर आलं आहे.