विशाखापट्टणममध्ये 18 तासांत 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यातील सरासरी पावसाच्या दीड पटीहून अधिक पाऊस येथे झाला आहे. जुलै महिन्यात येथील सरासरी पर्जन्यमान 133 मिमी असते. Cyclone Arnab: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्णब चक्रीवादळाने मंगळवारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला तडाखा दिला. राज्यात मुसळधार पाऊस आणि ताशी 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहत आहेत. आंध्र प्रदेशात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 31 घरांचे नुकसान झाले आहे.